File Photo 
मराठवाडा

ग्रँड कॉर्नरवरील मदनी हॉटेल आगीत जळून खाक, शौकीनांची गैरसोय...

गणेश पांडे

परभणी : शहरातील ग्रँड कॉर्नर परिसरातील मदनी या नॉनव्हेज हॉटेलला रविवारी (ता.सहा) सकाळी सातच्या सुमारास अचानक लागली. या आगीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. परंतू, तोपर्यत हॉटेल मधील सर्व जळून खाक झाले होते.

शहरातील ग्रॅन्ड कॉर्नर परिसरात मदनी हे नॉनव्हेज हॉटेल आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिण्यापासून हे हॉटेल बंद होते. परंतू, अलीकडे काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेलमधून पार्सल सुविधा सुरु करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे या हॉटेलमध्ये पार्सल सुविधा सुरु करण्यात आली होती. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे हे हॉटेल बंद करून हॉटेल मालक घरी गेले होते. परंतू, सकाळीच ही घटना घडली. या हॉटेलमधून रविवारी (ता.सहा) सकाळी मोठा धुर बाहेर येत असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसले.

हेही वाचा - नांदेड : दयानंद वनंजे यांच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाने खळबळ

धुराचे मोठे लोळ

आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न सुरु केले. आग लागल्याचे लक्षात येताच तातडीने नानलपेठ पोलिसांना व अग्निशामक दलास घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले. त्यापाठोपाठ आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आग लागलेल्या ठिकानावरुन धुराचे मोठे लोळ दुरुन दिसत होते. नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. अग्निशमन दलाचे दीपक कानडे, सर्जेराव मुंडे, पंढरीनाथ कालानी आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर हॉटेल ला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. या हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज हॉटेल मालकाने व्यक्त केला आहे.

आग सकाळी लागल्याने हॉटेल बंद होते. त्यामुळे शटर बंद असल्याने आत आग लागल्याचे स्थानिक रहिवाश्यांना उशिरा लक्षात आले. हॉटेलच्या वरून व खिडक्यामधून धुराचे लोट बाहेर पडत असताना नागरिकांच्या आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने अग्नीशमन दलाला ही माहिती दिली. परंतू तो पर्यंत संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले
होते.

पोलिस ठाण्यात आगीची नोंद

घटना घडल्यानंतर नानलपेठ पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेवून बचाव कार्य सुरु केले. या प्रकरणी नानलपेठ पोलिसांनी घटनेची नोंद
केली आहे. मांसाहारी शौकिनांसाठी हे हॉटेल अधिक प्रिय होते.

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

SCROLL FOR NEXT